Ad will apear here
Next
मुलांच्या मनात डोकावताना
किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. तसेच ही मुले भावनिकदृष्ट्या संवेदनशील होत असतात. अशा वयात मुलांना समजून घेण्याची गरज असते. ही जबाबदारी घरी पालक आणि शाळेत शिक्षकांची असते. १४-१५ वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या मनातील विचारांचे, भावनांचे वादळ, प्रश्न, स्वअस्तित्वाची जाणीव, मोठ्यांशी होणारा संघर्ष आणि मग मुलांचा स्वतःशीच होणारा संवाद डॉ. स्वाती गानू-टोकेकर यांनी ‘मुलांच्या मनात डोकावताना’ या पुस्तकामधून आदित्य या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाच्या डायरीतून मांडला आहे. शिकणे-शिकवणे आणि मुलाला मोठे करण्याच्या आनंदयात्रेत मुलांना बरोबर घेताना पालकांनी त्यांच्या मनात डोकावून पाहायला हवे, असा विचार लेखिकेने व्यक्त केला आहे. त्यातून मुलाला समजून घेता येते. त्यांच्यातील निरीक्षणशक्ती, उत्सुकता, सर्जनशीलता जाणून माणूसपण जपता येते. नात्याला समृद्धपण लाभते. नेहमी मोठ्यांच्या भूमिकेतून मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेणाऱ्या पालकांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला यातून मिळतो. तसेच आदित्यप्रमाणे आपणही स्वतःतील चांगल्याचा शोध घेऊन प्रगती करू शकतो, हे मुलांना या स्वसंवादातून समजते. 

पुस्तक : मुलांच्या मनात डोकावताना
लेखिका : डॉ. स्वाती गानू-टोकेकर
प्रकाशन : वैशाली प्रकाशन
पृष्ठे : १५५
मूल्य : १६० रुपये

(‘मुलांच्या मनात डोकावताना’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZSXCA
Similar Posts
गुड बाय डायबेटीस + डाएट मंत्रा मधुमेह म्हणजेच डायबेटीस हा आजार अन्य व्याधींचे कारण बनू शकतो. त्यावर आयुष्यभर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. अशा मधुमेहासंदर्भात डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुड बाय डायबेटीस’मधून जागृती केली आहे.
राजे शिवाजी + धर्मवीर राजे संभाजी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला तेव्हा त्यावेळी शहाजीराजे निजामशाही वाचविण्यात गर्क होते, तरी त्यांनी शिवबांच्या शिक्षणाची युद्ध प्रशिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. मातोश्री जिजाऊंनी त्यांच्या बालमनावर उत्तम संस्कार घडविले. शिवरायांनी चौदाव्या वर्षीच जुलमाने वागणाऱ्या रांझेगावच्या बाबाजी पाटलाला जबर शिक्षा सुनावून दुष्टांवर जरब बसविली
मधुमेह कसा होतो? मधुमेह अर्थात डायबेटीस हे अलीकडे आबालवृद्धांच्या काळजीचे कारण झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण मधुमेह झालेले अगदी कमी वयाचे रुग्णही आता सहज आढळू लागले आहेत. डायबेटीस कसा टाळायचा, तो का होतो, तो झाला तर काय करायचे, अशा विविध गोष्टींवर डॉ. कैलास कमोद यांनी ‘गुडबाय डायबेटीस’ या पुस्तकातून सविस्तर मार्गदर्शन केले आहे
माँसाहेब जिजाऊ पराक्रमी, लढवय्या, रयतेची काळजी घेणाऱ्या शिवबांची जडणघडण झाली ती त्यांची आई जिजाऊंच्या सान्निध्यात. आदिलशाहने शहाजीराजे यांची रवानगी बंगळूरला केल्यानंतर पुण्यातील जहागिरी सांभाळण्याची व लहानग्या शिवबाला घडविण्याची जबाबदारी जिजाबाईंवर आली. त्यांनी प्रथम लाल महाल बांधला. कसब्याला पांढरीवर शिवरायांच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language